Posts

मलंगगड – Malanggad Fort

Image
मलंगगड – Malanggad Fort मलंगगड – Malanggad Fort किल्ल्याची उंची: ३२०० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान चढाई श्रेणी: सोपी जिल्हा: ठाणे मलंगगड हा किल्ला कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर व अंबरनाथ पासून साधारण १०-१२ किमी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. अंबरनाथच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैऋत्येस आणि बोरघाट,भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मलंगगड हा किल्ला / डोंगर हाजीमलंग या नावाने पण ओळखला जातो. आज मलंगडावर अनेक हिंदु- मुस्लिम भाविक जात असतात. त्यापैकी फारच थोडेजण किल्ल्याच्या दुसर्याच माची पर्यंत जातात. तर गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणार्यात साहसामुळे (प्रस्तरारोहणामुळे) केवळ गिर्यारोहकच गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जातात. मुंबई शहारापासून अगदी जवळ असूनही दुर्लक्षित असलेल्या या पूरातन किल्ल्याला दैदिप्यमान इतिहास आहे. किल्ल्यावर पूरातन अवषेश आजही तग भरुन उभे आहेत. तसेच किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्या करीता कराव्या लागणार्यार स...